महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करतात.
कुडाळ उपविभागांतर्गत तालुका कुडाळ व तालुका मालवण विषयी कार्यवाही करण्यात येते. २०१३ साली कुडाळ उपविभाग स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. त्यापूर्वी कुडाळ तालुका सावंतवाडी उपविभागात आणि मालवण तालुका कणकवली उपविभागात येत असे.
मालवण तालुका: एकूण १२४ महसुली गावे, ९ मंडळ आणि ५२ सझा.
📂 मालवण तालुक्यातील महसुली गावे पहा