उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ

📢 सेवा संकल्प अभियान (दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६)

प्रशासन जनसामान्यांच्या दारी - विशेष सेवा सेतू शिबिरे

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त **'सेवा संकल्प अभियान'** प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर विशेष 'सेवा सेतू' शिबिरांचे आयोजन करून प्रलंबित फेरफार, सातबारा अद्ययावत करणे, स्वामित्व सनद वाटप, आधार व इतर २२ प्रकारच्या महत्त्वाच्या शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

अ.क्र. सेवा तपशील
१ फेरफार प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे महसूल अभिलेख अद्ययावत करणे व फेरफार मंजुरी.
२ असाइनमेंट / सातबारा अद्ययावत करणे गावाच्या सातबारा उताऱ्यावरील फेरफार व दुरुस्त्या पूर्ण करणे.
३ स्वामित्व सनद (Property Card) वाटप गावठाण भूमापन अंतर्गत मालकी हक्क सनद वितरण.
४ आधार नोंदणी व अद्ययावत सेवा नवीन आधार नोंदणी, मोबाईल नंबर व पत्ता बदल.
५ उत्पन्नाचा दाखला शासकीय योजना व विद्यार्थी लाभासाठी आवश्यक दाखला.
६ रहिवासी दाखला (Domicile Certificate) अधिवास प्रमाणपत्र वितरण.
७ जात प्रमाणपत्र (Caste Certificate) मागासवर्गीय व इतर प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र.
८ नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र वैधता व आरक्षणाकरिता प्रमाणपत्र.
९ ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती व फायद्याचे कार्ड.
१० दिव्यांग ओळखपत्र व लाभ दिव्यांग कल्याणकारी योजना व प्रमाणपत्र सेवा.
११ राशन कार्ड (शिधापत्रिका) सेवा नवीन नाव समाविष्ट करणे, नावे कमी करणे किंवा दुरुस्ती.
१२ प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना (PM-Kisan) केवायसी (e-KYC) व बँक खाते आधार सीडिंग तपासणी.
१३ शेतकरी अपघात विमा योजना पात्र शेतकऱ्यांच्या अपघाती दाव्यांचे अर्ज स्वीकारणे व प्रक्रियेत मदत.
१४ भूमि अभिलेख नकाशे व मोजणी अर्ज जमीन मोजणी अर्ज स्वीकारणे व जुने नकाशे उपलब्ध करणे.
१५ सामायिक पाणीपट्टी व वीज बिल सवलत मार्गदर्शन शेती वीज जोडणी व पाणीपुरवठा विषयक मार्गदर्शन.
१६ विविध पेन्शन योजना (श्रावण बाळ/संजय गांधी) निराधार व वृद्ध पेन्शन योजनांचे नवीन प्रस्ताव स्वीकारणे.
१७ विवाह नोंदणी प्रमाणपत्र विहित नमुन्यातील वैवाहिक नोंदणी व प्रमाणपत्र.
१८ जन्म आणि मृत्यू नोंदणी दाखले ग्रामपंचायत व नगरपरिषद स्तरावरील अद्ययावत दाखले.
१९ रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची शासकीय पोर्टलवर नोंदणी.
२० श्रम कार्ड (e-Shram Card) नोंदणी असंघटित कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस नोंदणी.
२१ अन्न धान्य पुरवठा व तक्रार निवारण स्वस्त धान्य दुकानांसंबंधीच्या तक्रारी व सेवा.
२२ सामान्य अर्ज व तक्रार निवारण कक्ष नागरिकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक अर्जांचे तत्काळ स्विकृतीकरण.

📢 जाहीर नोटीस: महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान

महसुली प्रकरणांचा तडजोडीने व गतीने निपटारा

कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व प्रकरणे गतीने मार्गी लावण्यासाठी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान' आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय (कुडाळ/मालवण) आणि सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांतील अपिले, चालू दावे तसेच फेरफार नोंदींवर सुनावणी घेतली जाईल.

📅 महसूल लोक अदालत सुनावणीचे वेळापत्रक

अ.क्र. स्थळ दिनांक व वेळ होणारे कामकाज
१ उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ
तहसीलदार कार्यालय कुडाळ
सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, ता. कुडाळ
३०-०९-२०२६ रोजी
सकाळी ११.०० वाजता
संबंधित कार्यालयात चालू असलेले दावे/हरकती/अपील प्रकरणे यांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी त्या-त्या कार्यालयात महसूल लोकअदालत घेतली जाईल.
२ तहसीलदार कार्यालय मालवण
(उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचकडील मालवण तालुक्यातील अपील/दावे)
सर्व मंडळ अधिकारी कार्यालये, ता. मालवण
०१-१०-२०२६ रोजी
सकाळी ११.०० वाजता
संबंधित कार्यालयात चालू असलेले दावे/हरकती/अपील प्रकरणे यांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी त्या-त्या कार्यालयात महसूल लोकअदालत घेतली जाईल.

तरी कुडाळ उपविभागातील सर्व संबंधित हितसंबंधित / पक्षकार, अर्जदार व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांच्या तडजोडीने निपटारा करण्यासाठी विहित कालावधीत संपर्क साधून या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

महसूल विभागामार्फत सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेले प्रकल्प

राज्य निवडणूक SIR प्रकल्प
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार Special Intensive Revision (SIR) प्रकल्पांतर्गत मतदार माहिती, पडताळणी आणि विविध अर्ज सुविधा उपलब्ध.
अधिक माहिती
Shimga Festival
Dreamland Garden
Lakshminarayn Temple
Thakarwadi Museum
Sindhudurg Fort
Fish Market
Rock Garden
Sea View

माननीय मंत्री व अधिकारी

Person Name
मा.ना.श्री.नितेश नारायण राणे

पालकमंत्री सिंधुदुर्ग
‘मंत्री मत्स्यद्योग,बंदरे महाराष्ट्र राज्य’
Person Name
मा.श्रीम.तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग

‘महसूल व वन विभाग’
Person Name
मा.श्री.निलेश नारायण राणे

आमदार

‘कुडाळ विधानसभा मतदारसंघ’
Person Name
श्रीम. ऐश्वर्या काळुशे

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी

‘उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ’
Person Name
श्री.सचिन पाटील

तहसीलदार

तहसील कार्यालय, कुडाळ
Person Name
श्री.गणेश लव्हे

तहसीलदार

‘तहसील कार्यालय, मालवण’
Person Name
श्री.प्रविण रा. हिर्लेकर

गट विकास अधिकारी

‘पंचायत समिती, कुडाळ’

Person Name
श्रीम.परागिणी पाटील

गट विकास अधिकारी

‘पंचायत समिती, मालवण’
Person Name
श्री.खंडू लक्ष्मण पवळ

मुख्य अधिकारी

‘नगरपंचायत कुडाळ’
Person Name
श्री.प्रतिक थोरात

मुख्य अधिकारी

‘नगरपरिषद मालवण’
Person Name
श्री.भास्कर चौगले

तालुका कृषी अधिकारी

‘तालुका कृषी कार्यालय,कुडाळ’
Person Name
" "

तालुका कृषी अधिकारी

‘तालुका कृषी कार्यालय,मालवण'